पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan T. N. Sheshan K. P. Unnikrishnan

इमेज
तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan     T. N. Sheshan      K. P. Unnikrishnan तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त. पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल. दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वागैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि... तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला. दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधि...

संत सावता माळी परिचय.

इमेज
                                                               संत परिचय सावता माळी जन्म : इ.स. १२५० समाधी - इ.स.१२९५ गाव :  अरण ,तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर. आजोबा- दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत.  पत्नी- जानाई अपत्य - विठ्ठल आणि नागाताई व्यवसाय - शेती सावता नावाचा अर्थ :          साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता माळी यांचे अभंग लिहिणारे :                                               सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दा...

Airtel कंपनी ह्या प्रकारे सुरु झाली नक्की वाचा How to strar airtel company सुनील मित्तल

इमेज
Airtel कंपनी ह्या प्रकारे सुरु झाली नक्की वाचा  How to strar airtel company सुनील मित्तल अप्रतिम लेख आहे नक्की वाचा :-  तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात " एअरटेल " नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं. AIRTEL:  त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला. आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुश...

उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका

इमेज
उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका  एका घरात पाच दिवे लावले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळुन सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.! आणि तो विझुन गेला. तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक.! हे पाहुन जो दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानेही हाच विचार करून तो सुद्धा विझुन गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझुन गेला. उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला. सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहीले , घरात एकच दिवा जळत होता. तो खुप खुष झाला. चार दिवे विझुन सुद्धा तो खुष होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालु आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलीत केले. तो पाचवा दिवा कोण होता ? तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलीत ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशीत होतील.