तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan T. N. Sheshan K. P. Unnikrishnan
तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan T. N. Sheshan K. P. Unnikrishnan तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त. पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल. दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वागैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि... तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला. दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधि...