मोबाईल चोरी गेलाय घाबरू नका फक्त हे काम करा त्वरित सापडेल मोबाईल.CENTRAL EQUIPMENT IDENTITIY REGISTER.(CEIR)
EMI Calculator
Loan Amount:Interest Rate (Annual %):
Tenure (Years):
संचार मंत्रालय :
सर्व मोबाईल धारकांसाठी खुशखबर भारत सरकारच्या संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागाने सर्व मोबाईल धारकांना आनंदाची बातमी व सेवा दिलेली आहे.
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मागील महिन्यातच संपूर्ण भारतामध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
मोबाईल हरवला किंवा चोरी झाला असेल तर ताबडतोब पुढील काम करा.
CENTRAL EQUIPMENT IDENTITIY REGISTER.(CEIR) :
भारत सरकारने बनविलेल्या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल हरवल्याचे किंवा चोरी झाल्याची तक्रार नोंदवा.
तक्रार नोंदवताना खालील गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- मोबाईल IMEI NO.
- मोबाईलचे बिल.
- पोलिसात दिलेली तक्रार.
- आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक.
मोबाईल IMEI NO.पाहण्यासाठी मोबाईलवर टाईप करा *#06#
चला तर मग स्टेप बाय स्टेप तक्रार कशी नोंदवायची ते समजून घेऊ.
या संकेतस्थळावर गेल्यावर सर्वप्रथम सर्विस वर क्लिक करा.
प्रथम क्रमांकाचे ऑप्शन लास्ट मोबाईल वर क्लिक करा.
त्यानंतर हरवलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. नंतर तुमच्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर डिवाइस ब्रँड म्हणजे मोबाईलची कंपनी निवडा, डिवाइस मॉडेल निवडा जर तुमच्याकडे मोबाईल बिल असेल तर ते तुम्ही येथे अपलोड करू शकता.
मोबाईल हरवण्याचे ठिकाण लिहा. तसेच मोबाईल हरवल्याचा दिनांक, राज्य, तालुका ,पोलीस स्टेशनची निवड करा .तसेच पोलीस तक्रार क्रमांक येथे लिहावा लागेल .तसेच पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीची प्रत या ठिकाणी अपलोड करावी लागेल.
आता तुम्ही तुमची माहिती भरा स्वतःचे नाव, पत्ता तसेच तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक निवड करून त्याचा फोटो अपलोड करा .कॅप्चा कोड भरा, आणि शेवटी तुमचा एखादा चालू नंबर असेल तर तो लिहा. त्यावर एक ओटीपी येईल तो भरा त्याखाली DISCLEMAR BOX वर क्लिक करा तुमची तक्रार नोंदवली जाईल.
आता तुमचा मोबाईल ज्याच्याकडे असेल त्यामध्ये जे सिम बदलले असले तरी त्याचा अलर्ट पोलिसांना मिळेल. तसेच तो मोबाईल बंद होईल. होतो कुणाला वापरता येणार नाही. किंवा गैरवृत्त होण्यापासून वाचवता येईल. तसेच तक्रारीचा स्टेटस पाहण्यासाठी सर्विस ला पुन्हा क्लिक करा. आणि तिथे तक्रारीचा चेक रिक्वेस्ट स्टेटस चेक करू शकता.
"मित्रांनो वरील माहिती आवडली असेल तर कृपया ही माहिती जास्त लोकांना शेअर करा"










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल