जुना मोबाईल घेताय सावधान .
मागील लेखात आपण चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल कसा मिळवायचा, ते पाहिले आता आपण या लेखांमध्ये जुना मोबाईल खरेदी करताना कशी काळजी घ्यायची ते पाहणार आहोत.
प्रत्येकाला नवीन मोबाईल फोन घ्यायला परवडलेच असे नाही. अशावेळी जुना वापरलेला मोबाईल सुद्धा विकत घेतला जातो .तर कधी स्वस्तात चांगला मोबाईल फोन मिळतोय म्हणूनही भुलथापांना बळी पडून जुना मोबाईल फोन खरेदी करण्याचा मोह भारी पडू शकतो. त्यामुळे जुना मोबाईल फोन घेताना अशी काळजी घ्या.
सर्व मोबाईल धारकांसाठी खुशखबर भारत सरकारच्या संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागाने सर्व मोबाईल धारकांना आनंदाची बातमी व सेवा दिलेली आहे.
आपण जो जुना मोबाईल घेत आहे तो चोरीचा आहे किंवा नाही हे कसे माहीत करणार, ते समजून घेऊ.
सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन KYM नावाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.अगदी सुरक्षित आहे.
सर्वप्रथम आपण जो जुना मोबाईल घेणार आहोत त्यामध्ये डायल करा *#06# तुम्हाला मोबाईलचा 15 अंकी EMEI नंबर दिसेल.
15 अंकी EMEI नंबर मोबाईल ॲप मध्ये प्रविष्ट करा तुमच्यासमोर मोबाईलची सर्व डिटेल्स येतील जसे कोणती कंपनी आहे कोणता ब्रँड आहे आणि कोणतं मॉडेल आहे त्यापुढे तुम्हाला रिझल्ट दिसेल.
जर तो चोरीचा मोबाईल असेल तर तुम्हाला वार्निंग येईल व तो नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये आहे किंवा नाही ते पण समजून त्यामुळे नकळत तुमच्याकडून होणारा अनर्थ टाळला जाईल.
तसेच एसएमएस द्वारे ही तुम्हाला मोबाईल चोरीचा आहे किंवा नाही ते मोबाईलच्या नंबर वरून समजेल
एसएमएस मध्ये जाऊन टाईप करा.
KYM _ 15डिजिटEMEI NO.
आणि पाठवा 14422 या नंबर वर लगेच तुम्हाला मोबाईलचे स्टेटस समजून जाईल आणि पुढील धोक्याची सूचना मिळेल.
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
मागील महिन्यातच संपूर्ण भारतामध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
👇👇हे पण वाचा👇👇
मोबाईल चोरी गेलाय घाबरू नका फक्त हे काम करा त्वरित सापडेल मोबाईल
"मित्रांनो वरील माहिती आवडली असेल तर कृपया ही माहिती जास्त लोकांना शेअर करा"
.jpeg)




Hi
उत्तर द्याहटवा