पोस्ट्स

कोल्ड्रिंकचे दुष्परिणाम

इमेज
  🥤 कोल्ड्रिंकचे दुष्परिणाम १. जास्त साखर एका बाटलीत (३०० मि.ली.) साधारण ८–१० चमचे साखर असते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह (डायबिटीज), दातांचे आजार होतात. २. आम्लपित्त व पचनाचे त्रास कोल्ड्रिंकचे pH खूप कमी (आम्लीय) असते. वारंवार प्यायल्यास आम्लपित्त, गॅस, अपचन वाढते. ३. हाडे कमजोर होणे यात असणारे फॉस्फरिक ऍसिड व कॅफिन कॅल्शियम कमी करतात. दीर्घकाळ सेवनाने हाडे व दात कमजोर होतात . ४. मूत्रपिंडावर परिणाम जास्त फॉस्फेट व साखरमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. ५. कॅफिनचे दुष्परिणाम बेचैनी, निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढणे. लहान मुलांमध्ये अति उत्साहीपणा व लक्ष कमी होणे . ६. हृदयाचे आजार नियमित सेवनामुळे स्थूलपणा → बीपी → हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. ७. कृत्रिम रंग व प्रिझर्वेटिव्ह्ज काही लोकांना अॅलर्जी, त्वचेचे विकार, दमा वाढण्याचा धोका असतो. ✅ पर्याय लिंबू सरबत ताक नारळ पाणी ताजे फळांचे रस 👉 म्हणजेच, कोल्ड्रिंक कधीतरी पिणे चालेल, पण दररोज सेवन आरोग्यासाठी घातक आहे.

जुना मोबाईल घेताय सावधान .

इमेज
  मागील लेखात आपण चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल कसा मिळवायचा, ते पाहिले आता आपण या लेखांमध्ये जुना मोबाईल खरेदी करताना कशी काळजी घ्यायची ते पाहणार आहोत. प्रत्येकाला नवीन मोबाईल फोन घ्यायला परवडलेच असे नाही. अशावेळी जुना वापरलेला मोबाईल सुद्धा विकत घेतला जातो .तर कधी स्वस्तात चांगला मोबाईल फोन मिळतोय म्हणूनही भुलथापांना बळी पडून जुना मोबाईल फोन खरेदी करण्याचा मोह भारी पडू शकतो. त्यामुळे जुना मोबाईल फोन घेताना अशी काळजी घ्या. सर्व मोबाईल धारकांसाठी खुशखबर भारत सरकारच्या संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागाने सर्व मोबाईल धारकांना आनंदाची बातमी व सेवा दिलेली आहे. आपण जो जुना मोबाईल घेत आहे तो चोरीचा आहे किंवा नाही हे कसे माहीत करणार, ते समजून घेऊ.       👇👇 हे पण वाचा 👇👇  या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट   सरपंच ग्रामसेवकही घाबरतील तुम्हाला ! जमिनीची मोजणी करा आता मोबाईलवर तुम्हाला किती रेशन मिळाले घरातील किती सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये आहेत असे पहा. सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन KYM  नावाचे मोब...

मोबाईल चोरी गेलाय घाबरू नका फक्त हे काम करा त्वरित सापडेल मोबाईल.CENTRAL EQUIPMENT IDENTITIY REGISTER.(CEIR)

इमेज
EMI CALULATER EMI Calculator EMI Calculator Loan Amount: Interest Rate (Annual %): Tenure (Years): Calculate EMI संचार मंत्रालय :  सर्व मोबाईल धारकांसाठी खुशखबर भारत सरकारच्या संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागाने सर्व मोबाईल धारकांना आनंदाची बातमी व सेवा दिलेली आहे. मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील महिन्यातच संपूर्ण भारतामध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. मोबाईल हरवला किंवा चोरी झाला असेल तर ताबडतोब पुढील काम करा. CENTRAL EQUIPMENT IDENTITIY REGISTER.(CEIR) : भारत सरकारने बनविलेल्या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल हरवल्याचे किंवा चोरी झाल्याची तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवताना खालील गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. मोबाईल IMEI NO. मोबाईलचे बिल. पोलिसात दिलेली तक्रार. आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक. मोबाईल IMEI NO.पाहण्यासाठी मोबाईलवर टाईप करा *#06# चला तर मग स्टेप बाय स्टेप तक्रार कशी नोंदवायची ते समजून घेऊ. या संकेतस्थळावर गेल्...

आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024 RTE ONLINE LOTTERY

इमेज
आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024 RTE ONLINE LOTTERY  RTE ADMISSION : Right To Education (RTE) म्हणजे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते RTE ONLINE LOTTERY : अर्ज करण्याची तारीख आता संपली आहे ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया ची तारीख नुकतीच जाहीर केलेली आहे   आर.टी.ई.ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त 25% जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.                                                                आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024   : 2023-2024 करिता सिलेक्शन यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी चार वाजता एसएमएस द्वारे सूचित केले जाईल. एसएमएस प्राप्त झाल्यावर आवश्यक कागदपत्रांसह आपण निवडलेल्या शाळेमध्ये कागदपत्रांची पूर्तता करू...

आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी !

इमेज
आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी.फक्त हे अँप करा डाऊनलोड . डाऊनलोड खूप वेळेस आपण मोटरसायकल किंवा कारने प्रवास करत असताना रस्यावर पोलीस दिसले कि मनामध्ये भीती तयार होते. आता पोलीस कागदपत्र चेक करणार.आणि आपले गाडीचे पेपर घाई मध्ये घरी विसरले ड्रायविंग लायसन आर.सी.बुक तर आता घाबरू नका . फक्त हे अँप करा डाऊनलोड. प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा. NEXTGEN MPARIVAHAN गव्हर्मेन्टचे हे अँप आहे या मध्ये तुम्ही SINGUP करून तुम्ही तुमचे ड्रायविंग लायसन आर.सी.बुक चे डिटेल भरा, लगेच डिजिटल स्वरूपात तुम्हाला तुमचे पेपर दिसू लागतील. ते पेपर दाखवून आपण सुखरूप प्रवास करू शकतो म्हणजे आता फिजिकल डोकमेण्ट ची आता गरज नाही .

तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan T. N. Sheshan K. P. Unnikrishnan

इमेज
तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan     T. N. Sheshan      K. P. Unnikrishnan तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त. पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल. दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वागैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि... तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला. दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधि...

संत सावता माळी परिचय.

इमेज
                                                               संत परिचय सावता माळी जन्म : इ.स. १२५० समाधी - इ.स.१२९५ गाव :  अरण ,तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर. आजोबा- दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत.  पत्नी- जानाई अपत्य - विठ्ठल आणि नागाताई व्यवसाय - शेती सावता नावाचा अर्थ :          साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता माळी यांचे अभंग लिहिणारे :                                               सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दा...

Airtel कंपनी ह्या प्रकारे सुरु झाली नक्की वाचा How to strar airtel company सुनील मित्तल

इमेज
Airtel कंपनी ह्या प्रकारे सुरु झाली नक्की वाचा  How to strar airtel company सुनील मित्तल अप्रतिम लेख आहे नक्की वाचा :-  तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात " एअरटेल " नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं. AIRTEL:  त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला. आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुश...

उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका

इमेज
उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका  एका घरात पाच दिवे लावले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळुन सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.! आणि तो विझुन गेला. तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक.! हे पाहुन जो दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानेही हाच विचार करून तो सुद्धा विझुन गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझुन गेला. उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला. सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहीले , घरात एकच दिवा जळत होता. तो खुप खुष झाला. चार दिवे विझुन सुद्धा तो खुष होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालु आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलीत केले. तो पाचवा दिवा कोण होता ? तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलीत ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशीत होतील.